News Flash

उलटी आल्याने मुलीने डोकं बसच्या खिडकीतून बाहेर काढलं आणि तितक्यात समोरुन वेगाने ट्रक आला अन्..

१३ वर्षीय तमन्ना चालकाच्या मागील सीटवर बसली होती

प्रातिनिधिक

उलटी आल्याने चालत्या बसच्या बाहेर डोकं काढणं एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. १३ वर्षीय मुलीने डोकं बाहेर काढताच समोरुन वेगाने आलेल्या ट्रकने तिचं मुंडकं उडवलं. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना आपली आई आणि बहिणीसोबत खांडवा ते इंदोरदरम्यान बसने प्रवास करत होती. तमन्ना चालकाच्या मागील सीटवर बसली होती. सकाळी ८ वाजता प्रवासाला सुरुवात झाली होती. ९.३० वाजण्याच्या सुमारास बस हायवेवर असताना तमन्नाला उलटी होऊ लागली आणि तिने डोकं खिडकीच्या बाहेर काढलं.

त्याचक्षणी समोरुन येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली आणि मुंडकं उडवलं. “आम्हाला काय झालं काहीच समजलं नाही. अचानक बसमध्ये आणि आमच्या अंगावर रक्त उडालं. काही सेकंदांनी तिची आई घाबरुन ओरडू लागली. ते भयानक होतं,” अशी माहिती बसमधील प्रवाशाने दिली आहे.

तमन्ना आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी चालली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. तमन्नाला मोठी अधिकारी करण्याचं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी तिला एका चांगल्या शाळेतही घातलं होतं. तमन्नाच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 10:44 am

Web Title: girl pokes head out of bus window beheaded in madhya pradesh sgy 87
Next Stories
1 YouTube वर रेसिपी चॅनेल सुरु केल्याने गँगस्टर लागला पोलिसांच्या हाती; सात वर्षांपासून होता फरार
2 अरररर घोळ झाला! भाजपाच्या प्रचार व्हिडीओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप
3 नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स न केल्याने महिलेने दाखल केला एफआयआर
Just Now!
X