02 March 2021

News Flash

घटना ऐकून पोलिसही हादरले! नववीतील विद्यार्थिनीवर आठ तरुणांनी १३ दिवस केला बलात्कार

"कृत्य करणाऱ्यांपैकी सहा आरोपी अल्पवयीन"

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

मैत्रिणींना भेटण्यासाठी गेलेल्या नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर आठ तरूणांनी सलग १३ दिवस बलात्कार केल्याची क्रूरतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. मैत्रिणीला भेटायला गेल्यानंतर एक तरुण तिला सोबत घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर त्यानं पीडित विद्यार्थिनीला आपल्या ८ मित्रांच्या हवाली केले. ही संतापजनक घटना छत्तीसगढमधील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आलं असून, सहा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिक्षण घेणारी पीडित मुलगी २० नोव्हेंबर रोजी मैत्रिणींना भेटायला जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर अंबिकापूर येथे ती मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तिथेच तिची भेट गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाशी भेटली. या तरुणाने पीडित मुलीला आपल्यासोबत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपी तरुणाने या मुलीवर काही दिवस बलात्कार केला.

पीडितेवर अत्याचार केल्यानंतर आरोपी तरुणाने मुलीला आपल्या मित्रांच्या हवाली केलं. आठ आरोपींकडून त्यानंतर काही दिवस या मुलीवर सातत्यानं बलात्कार करण्यात आला. सातत्यानं झालेल्या अत्याचारामुळे पीडिता बेशुद्ध झाली होती.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या घरातील लोक चिंतेत पडले होते. कुटुंबीयांनी मुलीचा सगळी शोध घेतला. कुठेही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी २० नोव्हेंबरला राजापूर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून काही पथके तयार करण्यात आली होती.

पोलिसांकडून मुलीचा शोध घेणं सुरू असतानाच एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी ५ डिसेंबरला अंबिकापुर जिल्ह्यातील सरगुजा येथून पीडित मुलीला शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवून घेतला. आपल्यावर १३ दिवसांत आठ जणांनी बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसही हादरले. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत सर्व आरोपांनी ताब्यात घेतले.

राजापूर पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहाजण अल्पवयीन आहेत. सर्व आरोपींवर अपहरण, बलात्कार आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन सज्ञान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:49 pm

Web Title: girl rape rape eight people 13 days with 9th student balrampur chhattisgarh bmh 90
Next Stories
1 5 G सेवा ते मोबाइल उत्पादन, समजून घ्या पंतप्रधान मोदींचा भारतीय टेलिकॉम क्षेत्रासंबंधीचा दृष्टीकोन
2 India Mobile Congress 2020 : 5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…
3 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नदरकैदेत, आपचा आरोप
Just Now!
X