News Flash

तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ चित्रण

राजस्थानात संगनेर येथे सात महिन्यांपूर्वी एका १७ वर्षांच्या मुलीवर एकाने इतर तिघांच्या मदतीने बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले व त्याचा वापर करून या मुलीला ब्लॅकमेल

| February 3, 2015 12:26 pm

तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ चित्रण

राजस्थानात संगनेर येथे सात महिन्यांपूर्वी एका १७ वर्षांच्या मुलीवर एकाने इतर तिघांच्या मदतीने बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले व त्याचा वापर करून या मुलीला ब्लॅकमेल करण्यात येत आहे असे पोलिसांनी सांगितले.
या मुलीने असे म्हटले आहे की, गेल्या वर्षी जूनमध्ये या चारजणांनी आपल्याला खेडय़ातून संगनेर येथे नेले व महेंद्र नावाच्या व्यक्तीने आपल्यावर बलात्कार करून त्याची व्हिडिओ काढली त्यानंतर तिला व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्या घरून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. महेंद्र मीणा, राहुल, गुड्डी व राजेंद्र यांनीही तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
तिने त्यांना जून ते नोव्हेंबपर्यंत २.३० लाख रुपये दिले, महेंद्र याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला होता. पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल  संगनेर पोलीस स्टेशनला दाखल केला.  मुलांची लैंगिक छळवणूक विरोधी कायदाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. संगनेर हे ठिकाण जयपूरच्या दक्षिणेला १६ कि.मी. अंतरावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 12:26 pm

Web Title: girl raped and and make video in rajasthan
Next Stories
1 दक्षिण दिल्लीत चर्चची मोडतोड
2 पाकच्या ‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, भारताची अनेक शहरे टप्प्यात
3 २०१४ मध्ये सर्वात उष्ण वर्षांचा विक्रम
Just Now!
X