News Flash

महाविद्यालयामधून पदवी प्रमाणपत्राबरोबरच मिळणार पासपोर्ट; विद्यार्थीनींसाठी ‘या’ राज्याची नवी योजना

मुख्यमंत्र्यांनीच एका कार्यक्रमात दिली माहिती

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे. पदवी परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यीनींना त्यांच्या पदवी प्रमाणपत्राबरोबरच पासपोर्टही दिला जाणार आहे. यासाठीची आवश्यक असणारी संपूर्ण कागदोपत्री प्रक्रिया ही कॉलेजमध्येच पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“प्रत्येक मुलीला पासपोर्ट मिळाला पाहिजे असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा पासपोर्ट विद्यार्थिनीला ती पदवीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्राबरोबर दिला जावा असं सरकारचं मत आहे,” अशी माहिती खट्टर यांनी दिली. ते शनिवारी ‘हर सर हेल्मेट’ या रस्ते सुरक्षासंदर्भातील कार्यक्रमामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत कर्नालमधील १०० विद्यार्थ्यांना वाहन परवाना आणि मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आलं. मुलांना वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील माहिती व्हावी म्हणून त्यांना शिकावू परवाने देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुलांना रस्ते सुरक्षेसंदर्भातील माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हेल्मेटचे वाटप केलं. “असे कार्यक्रम हे राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. या कार्यक्रमांचा परिणाम दिर्घकालीन असतो,” असं सांगत असे जनजागृतीचे कार्यक्रम करणं आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी नोदंवलं

हेल्मेटच्या वापराचा फायदा सांगताना मुख्यमंत्र्यांनी, “देशात दिवसाला १ हजार ३०० हून अपघात होतात. त्यामध्ये अनेकदा हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या दुखापतीने प्रवाशाचा मृत्यू होतो. आपल्या राज्यातच दिवसाला १३ जण अपघातांमध्ये प्राण गमावतात. एका संशोधनामध्ये हेल्मेट घालून गाडी चालवणाऱ्या चालकाचा अपघात झाल्यास तो वाचण्याची शक्यता ८० टक्के असते,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 4:49 pm

Web Title: girl students in haryana to get passport with graduation degree cm manohar lal khattar scsg 91
Next Stories
1 VIDEO: बंधक बनवल्यासारखी स्थिती, गाडीच्या चाव्या काढून घेतल्या, राजस्थानात आमदाराचा गंभीर आरोप
2 ‘आ बैल मुझे मार’ हे सचिन पायलट यांचं धोरण, अशोक गेहलोत यांची टीका
3 मोदी सूडाचं राजकारण करतात हा पवारांचा आरोप पटतो का?, जनमताचा कौल म्हणतो…
Just Now!
X