News Flash

बाईक नाही म्हणून व्हॅलेंटाइन्स डे ला गर्लफ्रेंडने टोमणा मारला आणि त्याने….

व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी ललित त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. त्यावेळी त्याच्याजवळ बाइक नव्हती.

संग्रहित छायाचित्र

गर्लफ्रेंडवर प्रभाव पाडण्यासाठी बाइक चोरणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपीचे नाव ललित आहे. व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी ललित त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. त्यावेळी त्याच्याजवळ बाइक नव्हती. म्हणून गर्लफ्रेंडने त्याला टोमणे मारले होते. त्याच रागातून ललितने गर्लफ्रेंडवर प्रभाव टाकण्यासाठी बाईक चोरीचा सपाटा लावला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

ललितने चोरीच्या या कटाबद्दल आधी त्याच्या मित्राबरोबर चर्चा केली नंतर त्याने बाइक चोरी सुरु केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ललित आणि त्याच्या मित्राला अटक केल्यानंतर या सर्व चोऱ्यांचा उलगडा झाला. दिल्लीच्या ठराविक भागामध्ये बाइक चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलीसही सर्तक झाले होते.

ते आरोपींच्या शोधात होते. सहा मार्चला द्वारकामध्ये बाइक चोरयेणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना एका बाइकवररुन दोन जण जाताना दिसले. त्या बाइकवर नंबरप्लेट नव्हती. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांसाठी इतकीच बाब पुरेशी होती.

पोलिसांनी त्यांना थांबवले व अटक केली. पोलिसांनी चौकशी सुरु करताच त्यांनी आठ बाइक चोरल्याची कबुली दिली. व्हॅलेंटाइन्स डे ला बाइक नाही म्हणून गर्लफ्रेंडने मारलेला टोमणा ललितच्या जिव्हारी लागला होता व तिला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून त्याने बाइक चोरल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 3:31 pm

Web Title: girlfriend on valentines day taunts boyfriend for not having a bike he steals eight dmp 82
Next Stories
1 coronavirus: रुग्णालयात उपचार घेत असलेला करोनाचा रुग्ण बेपत्ता; कर्नाटकात खळबळ
2 हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन हस्तकांना अटक
3 “माझ्याकडे जन्माचा दाखला नाही तर मी जीव देऊ का?”; मुख्यमंत्र्यांचा केंद्राला सवाल
Just Now!
X