News Flash

रात्री मुलीच्या खोलीत सापडल्यानंतर प्रियकराला कुटुंबीयांनी चोपलं, सकाळी जावई बनवलं

नेमकं काय घडलं?

प्रेमाच्या ओढीने प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या घरी गेला होता. आश्चर्य म्हणजे सकाळ होताच, या प्रियकराला मुलीच्या कुटुंबीयांनी थेट जावई बनवून घेतले. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ही विचित्र घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीच्या सुमारास मुलीला भेटायला आलेला तिचा प्रियकर कुटुंबीयांच्या हाती लागला. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी त्याला एका खोलीत बंद केले व रात्रभर मारहाण केली. सकाळ झाल्यानंतर त्या प्रियकराला पोलिसांकडे सोपवले. पण पोलीस केस नको म्हणून काही जणांनी तडजोड घडवून आणली. रात्रभर ज्या मुलाला मारहाण केली, त्याला दुसऱ्यादिवशी सकाळी घरच्यांनी थेट जावई बनवून घेतले. आज तकने हे वृत्त दिले आहे.

रामपूरच्या अझीमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मेहंदी नगरमधील सुमाली गावात हा विचित्र प्रकार घडला. गद्दी नागली गावातील एका युवकाचे मेहंदी नगरमधील सुमाली गावातील एका युवतीवर प्रेम होते. हा युवक बऱ्याचवेळा प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास हा युवक प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला.तो प्रेयसीसोबत खोलीत असतानाच मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले. त्यावेळी घरात एकच गोंधळ झाला व सर्वांनीच त्या मुलाला मारहाण सुरु केली.

त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले. या प्रकरणात तक्रार नोंदवली जाणार होती. मुलाचे कुटुंबीय सुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस आणि दोन्ही बाजूचे कुटुंबीय एकत्र बसले व त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मुली आणि मुलाकडचे दोघेही राजी झाले व लग्नाचा निर्णय घेतला. अझीमनगरमधल्या एका छोटया मंदिरात त्यांचे लग्न लावण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 1:54 pm

Web Title: girls family beats boy who came to meet at night couple married next day dmp 82
Next Stories
1 तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचं नाटक; असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल
2 आईनं किडनी दिल्यानंतरही अभिनेत्रीचा वाचला नाही जीव
3 बलात्काराचा खोटा आरोप करणं तरुणीला भोवलं; जन्माला आलेल्या बाळामुळे फुटले बिंग
Just Now!
X