News Flash

सेल्फी काढताना तळयात पडलेल्या मुलीला वाचवताना तिघांचा बुडून मृत्यू

तळयाच्या काठाजवळ पूजा चौघांचा एकत्र सेल्फी काढत होती.

सेल्फी काढताना तळयात पडलेल्या दोन मुलींना वाचवताना तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुण आहेत. गुजरातच्या राजकोटमधील राया गावात मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली. शक्ती सोलंकी, अजय परमार आणि त्रिभुवन मीरजा अशी मृतांची नावे आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

राया गावातील परशुराम मंदिराशेजारी असलेल्या तळयाजवळ ही घटना घडली. शक्ती आणि अजय दोघेही पूजा व दर्शनासोबत तिथे आले होते. तळयाच्या काठाजवळ पूजा चौघांचा एकत्र सेल्फी काढत असताना तिचा तोल गेला व ती पाण्यात पडली. त्यावेळी पूजाने तिच्यासोबत दर्शनालाही पाण्यात खेचले.

दोघींना बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी शक्ती आणि अजय दोघांनी पाण्यात उडी मारली. त्याचवेळी मीरजा सुद्धा तिथे होता. पाण्याबाहेर पडण्यासाठी चौघे जोरदार हातपाय मारत होते. मीरजाला पोहता येत असल्याने त्याने चौघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्याने दोन्ही मुलींना वाचवले. पण तो मुलांना वाचवू शकला नाही. अजय आणि शक्तीला वाचण्यासाठी मीरजा आणखी खोल पाण्यात गेला. पण तिथे तिघांचाही बुडून मृत्यू झाला. राजकोट अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:44 pm

Web Title: girls taking selfies fall in pond three drown dmp 82
Next Stories
1 #CAB: विधेयकाचा मसुदा आधी दाखवायला हवा होता, ही घाई कशासाठी? – काँग्रेस
2 #CAB : धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्यांना या विधेयकामुळे न्याय मिळणार – अमित शाह
3 FACT CHECK: खरंच कंपनीने ७५० टन व्हायग्रा नदीत सोडलं?; जाणून घ्या काय आहे सत्य
Just Now!
X