अ‍ॅसिड हल्ला झालेल्या व्यक्तींना खासगी रुग्णालयांनी मोफत उपचार द्यावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील भाजलेल्या व्यक्तीचे उपचार, औषधे व शस्त्रक्रियेचा खर्च खासगी रुग्णालयांनी करावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन बी. लोकूर व यू. यू. ललित यांनी सांगितले की, सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशातील खासगी रुग्णालयांना हा नियम लागू राहील. हल्ला झालेल्या व्यक्तींवर त्यांनी ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे.
 भारतीय वैद्यक परिषदेने हस्तक्षेप करून खासगी रुग्णालयांना मोफत उपचार करण्यास भाग पाडावे. २००६ मध्ये अ‍ॅसिड हल्ल्यात वाचलेल्या लक्ष्मीने दाखल केलेल्या लोकहिताच्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.