News Flash

प्रोटिन शेक द्या, तुरुंगात सुशील कुमारची मागणी

सुशील कुमारच्या याचिकेवर न्यायालय उद्या (बुधवार) निर्णय घेण्याची शक्यता आहे

ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विशेष आहार दिला जावा, अशी मागणी केली आहे.

सहकारी कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारने आता प्रोटिन शेक दिला जावा, अशी मागणी केली आहे. आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी प्रोटिन सप्लिमेंट, एक्सरसाइज बॅण्ड्स (व्यायामासाठी लागणारे पट्टे) व विशेष आहार दिला जावा, अशी सुशील कुमारने मागणी केली आहे.

दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं मिळवलेला एकमेव भारतीय खेळाडू असणाऱ्या सुशील कुमारने आपल्या मागणीसाठी दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. २३ जानेवारी रोजी दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या कुस्तीपटू सागर धनकड यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला अटक केलेली आहे.

सागर धनकड याचा मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, सुशील कुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे सागर धनकडचा मृत्यू झाला असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या हाती या मारहाणीची एक व्हिडिओ क्लिप लागली आहे, ज्यामध्ये सुशील कुमार व त्याचे सहकारी मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेनंतर अटकेपूर्वी सुशील कुमार जवळपास तीन आठवडे फरार होता.

सागर धनखड हत्या प्रकरण : साक्षीदारांचे रक्षण करण्यासाठी सरकारने पावले उचलावी!

तुरूंगात सर्वसाधरणपणे दररोज दोन वेळा दिला जाणाऱ्या आहारात ५ पोळ्या, दोन प्रकारची भाजी, वरण-भात असतो. याशिवाय, तुरूंगातील कॅन्टीमधून दर महिन्याला ६ हजार रुपयांपर्यंत खरेदी देखील करता येते. परंतु, सुशील कुमारसाठी हा आहार पुरेसा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विशेष आहारात सुशील कुमारला तीन ओमेगा कॅप्सुल, व्यायामा अगोदर लागणारं सप्लिमेंट आणि मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांसह अन्य बाबी हव्या आहेत. सुशील कुमारच्या याचिकेवर न्यायालय उद्या (बुधवार) निर्णय घेण्याची शक्यता आहे.सुशील कुमारला दिल्लीतील मंडोली तुरूंगातील स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कोणालाही भेटण्याची परवानगी दिलेली नाही.

दरम्यान, ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारचा कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात सहभाग असून या प्रकरणातील साक्षीदारांच्या रक्षणासाठी पावले उचला, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 6:50 pm

Web Title: give protein shake sushil kumar demands in jail msr 87
Next Stories
1 मोफत लसीकरणाची तयारी सुरु! केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर!
2 Corona vaccine policy: संसदीय अधिवेशनाची काँग्रेसची मागणी
3 राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यादरम्यान जातीय हिंसाचार; हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस
Just Now!
X