News Flash

गुड न्यूज! अखेर भारतात उपलब्ध झालं करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध

करोनावर हे औषध उपयोगी असल्याचा ग्लेनमार्कचा दावा

करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे. या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.

भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच DCGI या संस्थेकडून या औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. करोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे. लाइव्हमिंटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार औषध
औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे या कंपनीने सांगितले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधाच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर १४ दिवसांपर्यंत ८०० मिलिग्रॅमचे दोन डोस रोज घ्यायचे आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढला आहे. शुक्रवारपर्यंतच्या संख्येनुसार महाराष्ट्रात १ लाख २४ हजारांच्या वर रुग्णसंख्या आहे. मृत्यूंचंही प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रात शुक्रवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के आहे. तर शुक्रवारी राज्यात १९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारपर्यंतच्या संख्येनुसार महाराष्ट्रात ६२ हजार ७०० च्या वर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान करोनाचा प्रभाव वाढत असताना ग्लेनमार्क या कंपनीने करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 9:25 pm

Web Title: glenmark launches antiviral drug favipiravir trials show encouraging results in patients with mild to moderate covid scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 फक्त गलवान नाही, या शेजारी देशांबरोबरही सुरु आहेत चीनचे सीमावाद
2 “घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही”
3 ‘बसपा’च्या माजी नेत्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
Just Now!
X