18 February 2019

News Flash

…म्हणून पुढील दोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’

'रशिया टुडे' या वृत्तपत्राने दिली बातमी

इंटरनेट

जगभरातील इंटरनेट युझर्सला पुढील दोन दिवसांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीसंदर्भात समस्या येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

‘रशिया टुडे’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार, वार्षिक देखभालीच्या कामासाठी इंटरनेट सेवा पुरवणारे मुख्य सर्व्हर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) मार्फत सर्व्हर देखभालीचे महत्वाचे काम केले जाणार आहे. जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या महत्वाचे सर्व्हसमध्ये काही महत्वाचे तांत्रिक बदल करायचे आहेत. या डागडुजीमध्ये ‘क्रिटोग्राफिक की’ म्हणजे ज्यामध्ये जगभरातील वेबसाईट्सचे डोमेन नेम्स (वेबसाईट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात त्या ‘की’मध्ये बदल करण्यात येणार आहे. जगभरातील सायबर हल्ल्याचे वाढलेले प्रमाण बघता हे बदल करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएएनएन’ने सांगितले आहे.

‘आयसीएएनएन’शिवाय यासंदर्भात कम्युनिकेशन्स रेग्यलेट्री अथॉरीटीने (सीआरए) एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये जगभरातील डोमेन नेम्स सुरक्षित, स्थिर आणि सक्रीय राहण्यासाठी ही डागडुजी महत्वाची असल्याचे ‘सीआरए’ म्हटले आहे. काही इंटरनेट युझर्सला इंटरनेट वापरताना अडचणींना समोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे ‘सीआरए’ स्पष्ट केले आहे. ज्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांने या बदलांसंदर्भात तांत्रिक पूर्तता केली नसेल त्या या कंपन्यांकडून इंटरनेट सेवा घेणाऱ्यांना ही अडचण मोठ्या प्रमाणात येऊ शकते. मात्र इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते तांत्रिक बदल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी केल्यास या अडचणी येणार नाही असेही ‘सीआरए’ने या पत्रकात म्हटले आहे.

काशामध्ये येणार अडचणी

पुढील दोन दिवस इंटरनेटवरुन काही वेब पेजेस वाचता येणार नाहीत. तसेच काहींना ऑनलाइन व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

First Published on October 12, 2018 1:18 pm

Web Title: global internet shutdown likely over next 48 hrs