शुक्रवारी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) मधील बेंचमार्क इक्विटी निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरले. जागतिक बाँड बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला आणि इतर मालमत्तांच्या विक्रीत वाढ होण्याची भीती निर्माण झाली.

एस अॅन्ड पी बीएसई सेन्सेक्स १९३९.३२ अंकांनी (३.८० टक्के) घसरून ४९,०९९.९९ वर स्थिरावला, तर निफ्टी५० हा निर्देशांक ५६८.२० अंकांनी घसरून १४,५२९.१५ वर येऊन थांबला.संपूर्ण दिवसातील व्यापारात सेन्सेक्स २,१४८.८३ अंकांनी घसरून तो ४८,८९० या नीचांकावर पोहोचला, तर निफ्टी ६२९.६०अंकांनी घसरला आणि १४,४६७.७५ या नीचांकी पातळीवर येऊन स्थिर झाला.

जागतिक बाजार

शुक्रवारी जागतिक स्टॉक बाजारात घसरण झाली. नऊ महिन्यांत आशियाई स्टॉकमध्ये झालेली मोठी घसरण पाहण्यात आली. जागतिक बाँड बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला आणि इतर मालमत्तांच्या विक्रीत वाढ होण्याची भीती निर्माण झाली.

एमएससीआयच्या इमर्जिंग मार्केट्स इक्विटी निर्देशांकात जवळपास १० महिन्यांतील सर्वात मोठी घसरण झाली आणि तो २.७ टक्क्यांनी कमी झाला, एसटीओएक्सएक्स ६०० मध्ये 0.7 टक्क्यांनी घट झाली. एमएससीआय वर्ल्ड इक्विटी इंडेक्स जो ५० देशांमधील समभागांचा मागोवा घेतो, तो ०.९ टक्क्यांनी कमी होता म्हणजे यात एका महिन्यातील सर्वात जास्त नुकसान झाले.