News Flash

रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमणूक

डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस १ अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता

| May 10, 2021 01:32 am

भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले

लंडन: हॉलीवूडमधील अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह २०२० सालचे ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्य़ातील परिटेवाडी या खेडय़ात प्राथमिक शिक्षक असलेले डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस १ अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता. याच पुरस्काराशी साधम्र्य साधणाऱ्या ५० हजार अमेरिकी डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे.

अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे.

अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल  स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असते. आपण त्यांना  योग्य प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले आणि त्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले, तर ते जग पादाक्रांत करू शकतील. त्यांच्या कथांवर झोत टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी जागतिक विद्यार्थी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान असून अशा प्रेरणादायक उद्देशाला माझा पाठिंबा आहे.

-रणजितसिंह डिसले,  ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 1:32 am

Web Title: global teacher prize winner ranjitsinh disale joined global student prize academy zws 70
Next Stories
1 अफगाणिस्तान : शाळेतील बॉम्बस्फोटातील मृत्युसंख्या ५०
2 उत्तर प्रदेशात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर!; केंद्रीय मंत्र्याने केली कानउघाडणी
3 “डीआरडीओच्या नव्या औषधानं करोनारुग्ण लवकर बरे होणार”; वैज्ञानिकांनी व्यक्त केला विश्वास
Just Now!
X