21 September 2020

News Flash

आजपासून ‘गो एअर’चा स्पेशल सेल, 899 रुपयांमध्ये करा विमानप्रवास

10 लाख तिकीटांची विक्री होणार

विमानसेवा पुरवणारी कंपनी गो एअरने एका स्पेशल तिकीट सेलची घोषणा केली आहे. ‘गो एअर मेगा मिलियन’ असं या सेलला नाव देण्यात आलं आहे. याद्वारे कंपनीकडून देशांतर्गत प्रवासासाठी अवघ्या 899 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 27 मे अर्थात आजपासून या सेलची सुरूवात होत आहे.

27 मे पासून तीन दिवस प्रवाशांना या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. 10 लाख तिकीटांची विक्री कंपनीकडून करण्यात येणार आहे. या काळात बुकिंग केलेल्या प्रवाशांना 15 जून ते 31 डिसेंबर या काळात प्रवास करता येईल. प्रवाशांना तारीख, वेळ ठरविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय, 2 हजार 499 रुपयांपर्यंतचं तिकीट पेटीएमद्वारे खरेदी केल्यास 500 रुपयांची कॅशबॅक आणि मिंत्रा अॅपद्वारे 1 हजार 999 रुपयांपर्यंतचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना 10 टक्के थेट सवलत अशा अनेक ऑफर्स आहेत. पेटीएम आणि मिंत्रा अॅपवरील ऑफर 31 ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 9:37 am

Web Title: go air mega million sale flight tickets start from %e2%82%b9899
Next Stories
1 मुस्लिम तरुणाला काढायला लावली टोपी, जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मारहाण
2 देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड
3 मोदी यांचे इम्रान यांना दहशतवादमुक्तीचे आवाहन
Just Now!
X