News Flash

गोव्यात प्राणवायूअभावी चार दिवसांत ७५ बळी

मंगळवारी प्राणवायू भरला जात असताना काही अडथळे आल्याने दाब कमी होऊन २६ जणांचा बळी गेला होता.

दिवसभरात आणखी १३ करोना रुग्णांचा मृत्यू 

गोव्यात शुक्रवारी आणखी १३ करोना रुग्णांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांतील प्राणवायू न मिळाल्याने गेलेल्या बळींची संख्या ७५ वर पोहोचली आहे.

गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (जीएमसीएच) या संस्थेत प्राणवायू तुटवड्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी सुरू असताना शुक्रवारी सकाळी पुन्हा १३ रुग्णांचा प्राणवायूअभावी बळी गेला; परंतु गेल्या चार दिवसांत झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्यूंमागील नेमके कारण गोवा सरकारने न्यायालयात सांगितले नाही. प्राणवायूच्या वाहतुकीशी संबंधित अडचणी होत्या, असे कारण न्यायालयात देऊन गोवा सरकारने वेळ मारून नेली.

जीएमसीएच रुग्णालयात शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चार दिवसांतील एकूण बळींची संख्या ही ७५ झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्राणवायूच्या वाहतुकीमध्ये काही त्रुटी असल्याने प्राणवायू पुरवठ्यात व्यत्यय आला होता, असे गोवा सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले होते.

मंगळवारी प्राणवायू भरला जात असताना काही अडथळे आल्याने दाब कमी होऊन २६ जणांचा बळी गेला होता. रुग्णांना होणाऱ्या प्राणवायू पुरवठ्यात काही अडचणी आहेत त्याचा हा परिणाम आहे. याशिवायही इतर काही घटक त्याला कारणीभूत असू शकतात, असेही गोवा सरकारने न्यायालयात सांगितले होते.

पुरवठ्यात अडथळे

सरकारी आकडेवारीनुसार ‘जीएमसीएच’मध्ये मंगळवारी २६, बुधवारी २१, गुरुवारी १५, तर शुक्रवारी १३ अशा ७५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू प्राणवायूचा वेळेत पुरवठा न झाल्याने घडले, असा आरोप करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:21 am

Web Title: goa 75 people died in four days due to lack of oxygen akp 94
Next Stories
1 पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
2 उत्तर प्रदेशात कारागृहात गोळीबार, ३ कैदी ठार
3 अमेरिका मुखपट्टीमुक्तीच्या दिशेने!
Just Now!
X