News Flash

गोव्यातील समुद्रकिनारे आजपासून जीवरक्षकांविनाच

सरकारने कंत्राटाचे नूतनीकरण न केल्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर १५ सप्टेंबरपासून जीवरक्षक उपलब्ध होणार

| September 15, 2013 04:14 am

सरकारने कंत्राटाचे नूतनीकरण न केल्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर १५ सप्टेंबरपासून जीवरक्षक उपलब्ध होणार नाहीत. जीवरक्षक उपलब्ध करून देण्याची सुविधा खासगी संस्थेकडे असून त्यांनी ही सुविधा रविवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोव्याच्या पर्यटन मंत्रालयाने पाच वर्षांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न केल्याने जवळपास १०५ कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावरील ५५० जीवरक्षकांची सुविधा बंद करण्यात येत असल्याची नोटीस ‘दृष्टी स्पेशल रिस्पॉन्स सव्‍‌र्हिस’ने (डीएसआरएस) सरकारला दिली आहे.
तथापि, ही सुविधा पुरविण्यासाठी इच्छुक असलेल्या संस्थांकडून आम्ही नव्याने निविदा मागविल्या असल्याचे गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले. पर्यटकांचा मोसम सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सुरू होणार असताना समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांविनाच पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार का, या प्रश्नावर परुळेकर यांनी उत्तर देण्याचे टाळले.
डीएसआरएसला २००८ मध्ये हे कंत्राट देण्यात आले होते आणि त्यांना समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यास सांगितले होते. मात्र २०१० पासून ही संस्था गोव्याच्या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर जीवरक्षक उपलब्ध करून देत आहे. या संस्थेने गेल्या पाच वर्षांत समुद्रकिनाऱ्यावर १७५० जणांचे प्राण वाचविले आहेत, असे सदर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. कनवर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 4:14 am

Web Title: goa beaches will miss life security service from today
Next Stories
1 हिंदी भाषेमुळे देश एकसंध-राष्ट्रपती
2 रालोआला जिंकून देण्याचा निर्धार
3 ही तर भाजपची विनाशकाले विपरीत बुद्धी -नितीशकुमार
Just Now!
X