22 October 2020

News Flash

येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेशबंदी

सेल्स टॅक्स कमिशनची गेमिंग कमिशन म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गुरुवारी पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. कॅसिनो उद्योगाचे नियमन करण्यासाठी राज्याच्या सेल्स टॅक्स आयुक्तांना गेमिंग कमिशन म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“सेल्स टॅक्स कमिशनची गेमिंग कमिशन म्हणून नियुक्ती करण्यात येईल. एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी यासंबंधी अधिसूचना जारी होईल” असे सावंत यांनी सांगितले.

गेमिंग कमिशन अस्तित्वात आल्यानंतर कॅसिनो उद्योगाचे नियमन करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील. मांडवी नदीमध्ये उभ्या असलेल्या बोटींवर सध्या सहा कॅसिनो सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 5:37 pm

Web Title: goa casinos entry for locals banned from 1 st feb dmp
Next Stories
1 अर्णब गोस्वामीच्या ऑफिसबाहेर कुणाल कामराची पोस्टरबाजी, म्हणाला…
2 जेडीयूतून हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांना ‘या’ पक्षाकडून ऑफर
3 गॅस ‘भडकणार’! सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार ?
Just Now!
X