23 February 2019

News Flash

प्रकृती बिघडल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रूग्णालयात

अमेरिकेहून उपचार घेऊन ते सहा सप्टेंबरला पणजी येथे परतले होते

मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरुवारी संध्याकाळी कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती आत्ता कशी आहे याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
विधानसभेचे उपाध्यक्ष आणि भाजपा आमदार मायकल लोबो यांनी रुग्णालयात जाऊन पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे ६ सप्टेंबरलाच अमेरिकेतून उपचार घेऊन पणजीला परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे तीन महिने अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरु होते. सप्टेंबर महिन्यातच ते जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हापासून ते सराकारी बैठकीत सहभागी झाले नव्हते. घरातूनच ते काही फाइल्स पास करत होते अशीही माहिती समोर आली आहे. आता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First Published on September 14, 2018 1:03 pm

Web Title: goa chief minister manohar parrikar has been admitted to hospital