News Flash

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना करोनाची लागण, राज्याच्या सीमा खुल्या करताच मोठी घडामोड

संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना करोनाची लागण झाली आहे. प्रमोद सावंत यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रमोद सावंत यांनी घरातच विलगीकरणात राहत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी योग्य ती काळजी घेण्यात आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मला करोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसून घराचत विलगीकरणात राहत आहे. सध्या मी घरातूनच काम करत आहे. माझ्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी”.

महत्त्वाचं म्हणजे गोव्यात आजपासून सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार आणि रेस्तराँदेखील खुली करण्यात आली आहेत. प्रमोद सावंत यांनीच सोमवारी ही घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार मंगळवारपासून राज्याच्या नव्या सीमा खुल्या होतील. यामुळे सर्व वाहनांना गोव्या प्रवेश दिला जाणार असून त्यांची करोना चाचणी केली जाणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 11:22 am

Web Title: goa chief minister pramod sawant tests covid positive sgy 87
Next Stories
1 ‘त्या’ रात्री चीनला काही कळण्याआधीच भारतीय सैन्याने केलं ‘चेक मेट’…
2 उज्जैन महाकाल मंदिर : शिवलिंगावर केवळ शुद्ध दुधाचा अभिषेक करावा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
3 भय इथले संपत नाही! करोना रुग्णसंख्येची पुन्हा उसळी; १,०५४ जणांचा मृत्यू
Just Now!
X