लग्नापूर्वी एचआव्ही चाचणी बंधनकाकर करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच असा कायदा करण्यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासणार असल्याचे राणे म्हणाले.

गोव्यात एचआयव्हीचे प्रमाण वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी गोवा सरकार एक नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार लग्नापूर्वी वधू आणि वराला एचआयव्हीची चाचणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भातील एक विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर केले जाणार आहे. दरम्यान, गोव्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गोव्यात देहव्यापाराचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याचाच विचार करून गोवा सरकार लग्नापूर्वी एचआयव्हीची चाचणी करणे बंधनकारक करण्याच्या विचारात आहे.

दरम्यान, थॅलेसेमियाची चाचणीही करणे बंधनकारक करण्याचा विचार गोवा सरकार करीत आहे. तसेच एचआयव्ही आणि थॅलेसेमिया या चाचण्या लग्नापूर्वी करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. या कायद्याचे आपण समर्थन करत असल्याची माहिती विश्वजीत राणे यांनी दिली.