टोलनाक्यावरून जाणाऱ्या ट्रकचालकांकडून देय असलेला हजार रुपयांचा टोल न घेता त्यांच्याकडून केवळ ५०० रुपयांची लाच घेत त्यांना तसेच जाऊ देणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. राज्याच्या सीमेवरच्या टोलनाक्यांवरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही सरकारी कर्मचारी अशा ‘उद्योगां’मध्ये गुंतले असल्याचे चित्रीकरण स्थानिक वृत्तवाहिनीवरून दाखविण्यात आले होते. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.