24 September 2020

News Flash

गोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…

लॉकडाउनची घोषणा केल्यापासून पर्यटन होत बंद

संग्रहित छायाचित्र

गोवा म्हणजे पर्यटनाचं केंद्रच! त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळ आणि हॉटेल्स नेहमी देशातील विदेशातील पर्यटकांनी गजबलेल्या असायच्या. पण करोनाच्या विषाणूनं करोना शांत, बंदिस्त होऊन गेला आहे. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर गोव्यातील पर्यटनासाठी दरवाजे बंद झाले. दरम्यानच्या काळात गोवा करोनामुक्तही झाला. पण, प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर करोना पुन्हा गोव्यात दाखल झाला. अखेर या पाठशिवणीच्या खेळानंतर गोव्यातील पर्यटनाचे दरवाजे उद्यापासून खुले होत आहेत. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी विषयीची माहिती दिली.

एकदा करोनामुक्त होऊनही पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याची निश्चित केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या २५० हॉटेल्सला पर्यटन विभागानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

“सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं बुकिंग अगोदरच करावं लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. किंवा प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या क्वारंटाईन ठेवलं जाईल,” असं अजगावकर म्हणाले.

“ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे,” असंही पर्यटनमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 8:06 pm

Web Title: goa open to domestic tourists from july 2 minister bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश
2 करोनामुळं बरीच बंधनं आली, पण गुप्तरोगाच्या प्रसारात मात्र वाढ
3 धक्कादायक: चाचणीचा अहवाल येईपर्यंत करोनाबाधिताचं पार्थिव दोन दिवस होतं घरातच
Just Now!
X