कोठडीत मृत्यू झाला असतानाही एफआयआर नोंदविण्यास नकार दिल्याप्रकरणी एका पोलीस निरीक्षकावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोवा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने या निरीक्षकाला राज्यभरातील १० ग्रामपंचायतींमध्ये समाजसेवा करण्याची शिक्षा ठोठावली आहे.
परदेशस्थ भारतीय सायप्रियानो फर्नाडिस याचा १५ जानेवारी २०११ रोजी कोठडीत मृत्यू झाला. त्याबाबत एफआयआर नोंदविण्यास पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी नकार दिला. एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पणजी पोलिसांनी फर्नाडिस याला अटक केली होती.
फर्नाडिस याचा पोलीस कोठडीत छळ करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर आणि अनेक पोलिसांना त्या संदर्भात निलंबित करण्यात आले असून त्याची चौकशी प्रलंबित आहे. फर्नाडिस मरण पावल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले. सदर रुग्णालय हे कर्पे प्रमुख अधिकारी असलेल्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात आहे.
कर्पे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जोवेट डीसोझा या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. प्राधिकरणाचे अध्यक्ष आरएमएस खंडेपारकर यांनी कर्पे यांना त्यांच्या आवडीच्या १० ग्रामपंचायतींमध्ये समाजकार्य करण्याची शिक्षा ठोठावली. प्राधिकरणाचे अस्तित्व, त्याच्या कारभाराची पद्धत, उद्देश आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया या बाबत सदस्यांमध्ये जनजागृती करण्याची शिक्षा कर्पे यांना ठोठाविणयात आली आहे.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल