27 September 2020

News Flash

गोवा: भाजपात दाखल झालेल्या काँग्रेसच्या तीन आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

विजय सरदेसाई यांनी या प्रकारावर टीका केली असून काँग्रेसच्या आमदारांना भाजपात घेऊन मंत्रीपदं देणे हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या परंपरेविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पणजी : गोव्यात शनिवारी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला.

गोवा सरकाचा शनिवारी मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यावेळी चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या १० आमदारांपैकी ३ जणांना समावेश आहे. चंद्रकांत कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्ज आणि जेनिफर मोनसेराट अशी या मंत्र्यांची नावे आहेत. तर गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनाही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आमदारांना आणि एका अपक्ष आमदाराला कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, गोव्याच्या मंत्रीमंडळातून उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जल संसाधन मंत्री विनोद पालेकर, ग्रामविकास मंत्री जयेश साळगांवकर या तीन गोवा फॉरवर्ड पार्टीच्या आमदारांसह महसूल मंत्री रोहन खुंटे या अपक्ष आमदाराला मंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर मंत्रीपदाची शपथ घेण्याआधी काही वेळापूर्वीच लोबो यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, चंद्रकांत कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार बुधवारी रात्री भाजपात सामिल झाले होते. त्यानंतर आता गोव्याच्या ४० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या केवळ ५ इतकी राहिली आहे.

गोव्याची माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी या प्रकारावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या १० आमदारांना भाजपात सहभागी करणे हे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या परंपरेला संपवल्यासारखे आहे. कारण, मनोहर पर्रिकर यांनी भाजपाकडे बहुमत नसताना प्रादेशिक पक्षांची एकजुट करीत २०१७ मध्ये गोव्यात सरकार स्थापन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 7:35 pm

Web Title: goa three congress mlas who have entered bjp have taken oath as ministers aau 85
Next Stories
1 6 महिन्यांमध्ये 24 हजार अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार
2 राहुल मी तुमच्याकडून खुप काही शिकलो – रॉबर्ट वढेरा
3 प. बंगालमधील विरोधीपक्षांचे १०७ आमदार भाजपात होणार दाखल: मुकुल रॉय
Just Now!
X