गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मध्ये झालेल्या साखळी स्फोटांतील आरोपी महम्मद इरफान कुरेशी याला स्थानिक न्यायालयाने मंगळवारी १२ दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली.
दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी त्याला अटक केली. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर त्याला या विभागाच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या स्फोटात तीनजण ठार झाले होते. या गुन्ह्य़ात अन्य कुणाचा सहभाग होता का, याची चौकशी होणार आहे.