21 November 2019

News Flash

नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या अर्थ विभागातील १५ बड्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

या सर्व अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर असताना नियमांविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि कस्टम बोर्डाच्या १५ बड्या अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती दिली आहे. यापूर्वीही सरकारने आयकर विभागातील १२ बड्या अधिकाऱ्यांकडून १० जून रोजी राजीनामे मागितले होते. या सर्व अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर असताना नियमांविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विविध तपास यंत्रणांनी कारवाईची शिफारस केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.


ज्या अधिकाऱ्यांना सरकारने पदमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये मुख्य आयुक्त, आयुक्त, अतरिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त पदांवर नियुक्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियम ५६ नुसार अर्थमंत्रालयाने ही कारवाई केली आहे. एएनआयने अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये मुख्य आयुक्त डॉ. अनुप श्रीवास्तव, आयुक्त अतुल दीक्षित, संसार चंद, जी. श्री. हर्षा आणि विनय ब्रिजसिंह या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त आयुक्त पदावरुन अशोक आर. महिंदा, वीरेंद्र कुमार अग्रवाल आणि राजू सेकर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

तसेच उपायुक्त पदावर नियुक्त असलेले अमरेश जैन आणि अशोक कुमार असवाल, सहआयुक्त नलिन कुमार, सहाय्यक आयुक्त एस. एस. पबाना, एस. एस. बिष्त, विनोद कुमार सांगा, मोहम्मद अल्ताफ यांनाही पदमुक्त करण्यात येणार आहे.

First Published on June 18, 2019 3:48 pm

Web Title: goi compulsorily retires 15 very senior officers in commissioner of central board of indirect taxes and customs cbic aau 85
Just Now!
X