काळे पैसे बाळगणाऱ्यांवर केंद्र सरकारची करडी नजर असणार आहे. सोने, हिऱ्यांची खरेदी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आहे. त्यामुळे काळा पैशांचा बंदोबस्त करु पाहणारे लोक अडचणीत येऊ शकतात. सरकारला संशयास्पद वाटणाऱ्या सर्व व्यवहारांची चौकशी होणार आहे. त्यामुळे काळ्या पैशांची विल्हेवाट लावू पाहणाऱ्या लोकांसमोरील समस्या वाढू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून सोन्याच्या दुकानांमधील गर्दी वाढली. अनेकांनी त्यांच्याकडे असणारा बेहिशेबी पैसा सोन्यामध्ये गुंतवण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे ८ नोव्हेंबरनंतर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. आता हे सर्वच व्यवहार सरकारच्या रडारवर असल्याने बेहिशेबी पैशांचे सोन्यात रुपांतर केलेल्या अनेकांच्या अडचणींमध्ये अडचणी वाढू शकतात.

काळा पैसा बाळगणाऱ्यांवर सरकारची करडी नजर आहे. सोने, हिऱ्यांचे खरेदी विक्री व्यवहार सरकारच्या रडारवर आहेत. याशिवाय नोटबंदीच्या निर्णयानंतर परकीय चलनाचे व्यवहार करणाऱ्यांवर सरकारी यंत्रणांचे बारीक लक्ष्य आहे. मोठ्या प्रमाणात हे व्यवहार करणाऱ्या लोकांची चौकशी केली जाणार आहे. आयकर विभाग, अंमलबजावणी संचलनालय यांच्याकडून संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे काळा पैशांचा बंदोबस्त करु पाहणाऱ्यांच्या गळ्याभोवती कारवाईचा फास आवळला जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला आठवडा पूर्ण झाला आहे. या कालावधीत अनेकांनी त्यांच्याकडे असणारा बेहिशेबी पैसा जिरवण्याचा प्रयत्न केला. मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी काळ्या पैशांचा सर्वाधिक वापर झाल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे आता सोने, हिरे यांच्या खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार आता केंद्र सरकारच्या स्कॅनरखाली असणार आहेत.