News Flash

सहा दिवसांत सोन्याला १,७०० रुपयांची झळाळी; काय करायचं विकायचं की विकत घ्यायचं?

डॉलरचे मूल्य घसरल्याने आणि बायडन यांच्या विजयाने सोन्याच्या दरात तेजी

(संग्रहित छायाचित्र)

सोन्याच्या दरानं भारतात सोमवारी नवा उच्चांक गाठला. डॉलरचं मूल्य घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आशियातील सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. डॉलरचे मूल्य घसरल्याने तसेच अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांचा विजय झाल्याने त्याचा परिणामही सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. भारतात चंदीगड शहरात सोन्याचा आजचा भाव हा सर्वाधिक ५५,५०० रुपये आहे.

मल्टि कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) डिसेंबरमध्ये सोन्याचा वायदा दरात प्रति तोळा अर्धा टक्क्यांनी किंवा २४० रुपयांनी वाढ होऊन ५२,४०७ रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६६,३३६ रुपयांवर होता. हे दर १.५३ टक्क्यांनी किंवा १,००१ रुपयांनी वाढले आहेत. विश्लेषकांच्या मते बायडन आणि त्यांच्या टीमने कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी आधीच काम सुरु केले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी त्याच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु होतील. एकूण बाजाराचे चित्र हे सकारात्मक आहे, असं आनंद राठी शेअर्श अँड स्टॉक ब्रोकर्सचे जिगर त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यापासून सराफा बाजाराच्या नफ्यात वाढ झाली आहे. यावर्षी जुलैपासून आत्तापर्यंतचा सोन्यान्या दराबाबत हा सर्वात चांगला आठवडा ठरला आहे. डॉलर कमजोर झाल्याने हे होऊ शकले आहे. मागील आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत प्रतितोळा ४ टक्क्यांनी किंवा १,५०० रुपयांनी वाढ झाली होती. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, “२०२० च्या पहिल्या सहामाहीत एमसीएक्समध्ये सोन्याच्या किंमती ५४,००० रुपये प्रतितोळा दराला स्पर्श करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” ट्रेडबल्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक संशोधन विश्लेषक भाविक पटेल यांनी फायनान्शियल एक्सप्रेस ऑनलाइनशी बोलताना ही माहिती दिली.

एमसीएक्सवरील जुन्या किंमतींनी प्रतितोळा ५६,१९१ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता तर चांदीच्या किंमतीत या वर्षी ऑगस्टमध्ये ७७,९४९ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढ झाली होती. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी नवनीत दमानी यांनी सांगितले की, नंतर बँक ऑफ इंग्लंड (बीओई) आणि युरोपियन सेन्ट्रल बँक (ईसीबी) गव्हर्नरच्या भाषणांवर लक्ष केंद्रीत केले जाईल ज्यामुळे बाजारात काहीशी अस्थिरता येऊ शकेल. दमानी म्हणाले, “कोमेक्सवरील दर हे प्रतितोळा ५१,९०० ते ५२,७५० पर्यंत पोहोचू शकतात.”

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी गुंतवणूकदारांनी काय करावे?

येत्या धनत्रयोदशी दिवशी आणि दिवाळी सणादरम्यान मध्यम ते दीर्घ मुदतीच्या दृष्टीने नवीन सोनं विकत घेण्याची किंवा आधीचं सोनं न विकण्याचा सल्ला भाविक पटेल यांनी दिला आहे. कारण सोन्याच्या किंमती या काळात आणखीन वाढण्याचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 12:16 pm

Web Title: gold prices rally over rs 1700 in 6 days should investors buy sell or hold ahead of dhanteras diwali aau 85
Next Stories
1 वाढदिवशीच मुलाचे निधन, कॉमेडियन राजीव निगमची भावूक पोस्ट
2 पराभव आता मान्य करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पत्नीचा सल्ला
3 सरकारी काम… रस्ता बांधला पण नदीवरील पूल बांधायला विसरले; १५ वर्षांपासून जीव मुठीत घेऊन स्थानिक करतात प्रवास
Just Now!
X