News Flash

सोनं पहिल्यांदाच 50 हजारांपार, चांदीच्या दरानेही गाठला नवा उच्चांक

सोन्या-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक...

करोना संकटाच्या काळात देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी(दि.22) भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने तर नवा उच्चांक गाठला आहे.

चांदीचे दर 61 हजार रुपये प्रति किलोग्राम झाले, तर सोन्याच्या दरांनीही प्रति 10 ग्रामसाठी 50 हजार रुपयांचा आकडा ओलांडला. बुधवारी भारतीय बाजारात एक किलोग्राम चांदीचे दर 61,200 रुपये झाले. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचं सांगितलं जात आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सकाळी चांदीचे दर 58,000 रुपये होते, थोड्याच वेळात यात वाढ झाली आणि दर 61,200 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले. तर सोन्याच्या दरांनीही 50 हजाराचा आकडा ओलांडला. बुधवारी एमसीएक्सवर सुरूवात होताच सोन्याचे दर 49,931 रुपयांवरुन थेट 50,020 रुपये प्रति 10 ग्रामच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.

करोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीतील गुंतवणूक वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर, अनलॉकनंतर इंडस्ट्रीयल डिमांड वाढल्यामुळेही चांदीच्या दरात वाढ झाली असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण या वाढलेल्या दरांमुळे सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना मात्र चांगलाच घाम फुटला आहे.

किती होते दर? –
चांदीचा दर 1 जानेवारी रोजी 47666 रुपये प्रति किलो होता. तर , 31 डिसेंबर 2019 रोजी सोन्याचे दर 49996 रुपये प्रति 10 ग्राम होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:05 pm

Web Title: gold rate india hits record high cross rs 50000 mark for first time and silver rates cross rs 60000 per kg sas 89
Next Stories
1 मध्य प्रदेश : लॉकडाउनदरम्यान खाणीत काम करताना सापडला हिरा, किंमत पाहून व्हाल थक्क
2 LAC वर निर्माण झाली कोंडी, चीन बरोबर पुढच्या बैठकीची नाही खात्री
3 “अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहा”; फडणवीस यांना वाढदिवसाच्या ‘शाही’ शुभेच्छा
Just Now!
X