टर्कीमध्ये ९९ टन  (अंदाजे ८९ हजार ८११ किलो) सोन्याचा साठा सापडला आहे. या सोन्याची किंमत सहा बिलियन डॉलर म्हणजे ६०० कोटी डॉलर (अंदाजे ४३ हजार ८०० कोटी रुपये) असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही रक्कम अनेक देशांच्या राष्ट्रीय सखल उत्तपन्नापेक्षाही अनेक पटींने अधिक आहे. सोनाचा एवढा मोठा साठा असणाऱ्या खाणीचा शोध फाहरेटिन पाईराज या व्यक्तीने लावला आहे. पाईराज हे टर्कीमधील अ‍ॅग्रीकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्स या संस्थेचे प्रमुख आहेत.

नक्की वाचा >> या वर्षी २८ टक्क्यांनी महाग झालं सोनं; जाणून घ्या २०२१ मध्ये कसे असतील सोन्याचे दर

एका स्थानिक वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पाईराज यांनी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही या साठ्यापैकी काही भाग खोदकाम करुन यशस्वीपणे वर काढू असा विश्वास व्यक्त केला आहे. सोन्याच्या या साठ्यामुळे टर्कीच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागणार असल्याचे सांगितले जात आहे. याच वर्षी टर्कीने सोन्याचं उत्पादन घेण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. २०२० मध्ये टर्कीने ३८ टन सोन्याचं उत्पादन घेतलं आहे. देशाचे ऊर्जामंत्री फेथ डॉनमेज यांनी सप्टेंबर महिन्यामध्येच टर्की या वर्षी अंदाजे १०० टन सोन्याचं उत्पादन घेईल अशी शक्यता व्यक्त केलेली.

नक्की वाचा >> अमेरिकेत बेरोजगारांना दर आठवड्याला २२ हजार तर गरजूंना मिळणार ४४ हजार रुपये

टर्कीमध्ये सोन्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साठा आढळून आल्यानंतर याची किंमत किती असेल यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सोन्याची एकूण किंमत ही सहा अब्ज डॉलर इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही अधिक आहे. मालदीवचा जीडीपी ४.८७ अब्ज इतका आहे. तर बुरुंडी, बार्बाडोस, गयाना, मॉन्टेनेगरो, मॉरिशियाना यासारख्या देशांचा जीडीपीही सहा अब्ज डॉलर्सपेक्षा कमीच आहे.

नक्की पाहा >> Top 10 : या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

टर्कीला परदेशातूनही मदत मिळणार

एकीकडे या सोन्याच्या साठ्यामुळे टर्कीला फायदा होणार आहे तर दुसरीकडे युरोपीयन महासंघाकडून टर्कीला ५०० मलियन डॉलरची मदत केली जाणार आहे. सीरियामधून टर्कीमध्ये आलेल्या निर्वासितांची मदत करण्यासाठी टर्कीला हा निधी देण्यात येणार आहे. १८ लाख निर्वासितांना युरोपीयन महासंघ थेट आर्थिक मदत करणार आहे. तसेच निर्वासितांच्या सात लाख मुलांच्या शिक्षणासाठीही निधी पुरवण्यात येणार आहे. निर्वासितांच्या पुनर्वसनाचे सर्व नियोजन टर्कीमधील रेड क्रिसेंट ही संस्था करत आहे. यासाठी यूनिसेफ आणि रेड क्रॉसनेही एकत्र येत काम सुरु केलं आहे.

नक्की पाहा >> ३० हजार ६६० कोटींचे दान… चार महिन्यात ‘तिने’ ३८४ संस्थांना केली मदत