News Flash

अच्छे दिन आयेंगे; आसाराम बापूची ऑडिओ क्लिप व्हायरल

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी जोधपूरमधील न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या आसाराम बापू जोधपूरमधील कारागृहात आहे.

अच्छे दिन आयेंगे; आसाराम बापूची ऑडिओ क्लिप व्हायरल
आसाराम बापू

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘माझा तुरुंगवास तात्पुरता आहे. अच्छे दिन नक्की येतील’, असे आसाराम बापूने या क्लिपमध्ये म्हटले आहे. या क्लिपची दखल जोधपूर कारागृह प्रशासनानेही घेतली आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी जोधपूरमधील न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या आसाराम बापू जोधपूरमधील कारागृहात आहे. आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या दोन दिवसानंतरची ही ऑडिओ क्लिप आहे. १५ मिनिटांच्या या क्लिपमध्ये आसारामने भक्तांचे आभार मानले आहे. निकालाच्या दिवशी शांतता कायम राखल्याबद्दल तसेच जोधपूर न्यायालयाच्या आवारात गर्दी न केल्याबद्दल त्याने समर्थकांचे आभार मानले. आपण सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. काही लोकांनी मला आणि आश्रमाला बदनाम करुन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कट रचला. आश्रमाच्या लेटरहेडवर येणाऱ्या पत्रकांवर विश्वास ठेवू नका, असे आसाराम या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतो.

माझ्यासह या खटल्यात दोषी ठरलेले शिल्पी आणि शरत चंद्र या दोघांची आधी तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न करणार. मुलांची जबाबदारी पालकांची असते, असे आसारामने म्हटले आहे. जर कनिष्ठ न्यायालयाने चुक केली असेल तर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट त्या चुका सुधारेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. खरं कधी लपून राहत नाही आणि खोटं फार काळ टिकू शकत नाही, अच्छे दिन नक्की येतील, असे त्याने समर्थकांना उद्देशून सांगितले.

जेल प्रशासनाने ऑडिओ क्लिप खरी असू शकते, असे सांगितले. तुरुंगातील प्रत्येक कैद्याला महिन्याला ८० मिनिटे फोनवर बोलण्याची मुभा असते. आसाराम बापूने तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनेच साबरमती आश्रमातील एका साधकाला फोन केला. त्यानेच आसाराम बापूचे बोलणे रेकॉर्ड केले असावे आणि ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली असावी, असे जोधपूर कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2018 3:10 pm

Web Title: good days will come audio clip of asaram serving life term at jodhpur jail viral
Next Stories
1 गाव हागणदारीमुक्त आणि स्वच्छ नसेल तर फुकटचं तांदूळ बंद: किरण बेदी
2 चीनच्या राष्ट्राध्यक्षांनाही बॉलिवूडची भुरळ
3 पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी २० टक्क्यांची वाढ, भारताला शह देण्याचा प्रयत्न