देशभरात ६९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना महाजालातील लोकप्रीय सर्ज इंजिन गुगलनेही भारतीयांना डुडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे. या डुडलमधून महात्मा गांधींनी नेतृत्त्व केलेल्या दांडी यात्रेचे स्मरण करुन देण्यात आले आहे. गुगलकडून दरवेळी महत्त्वाचे क्षण, उत्सव, सण आणि राष्ट्रीय दिवसांची आठवण म्हणून खास डुडल रेखाटण्यात येते. याहीवेळी गुगलने भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व ओळखून खास डुडल चितारले. नुकतीच गुगलच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली होती.