News Flash

सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल

स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना गुगलची मानवंदना

सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त गुगलचे डूडल

गुगलने सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक कार्याला डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या १८६ व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल तयार केले आहे. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरण यांच्यासाठी केलेल्या कार्याला मानवंदना म्हणून गुगलने डूडल केले आहे. सर्व स्त्रियांना मायेने आपल्या पदराखाली सावित्रीबाईंचे डूडल गुगलकडून तयार करण्यात आले आहे.

३ जानेवारी १८३१ ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. महिलांचे शिक्षण आणि त्यांचे सबलीकरण यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि कवी म्हणून सावित्रीबाई फुले सुपरिचित आहेत. आपल्या साहित्यातून सावित्रीबाईंनी नेहमीच समानतेचा पुरस्कार केला. सामाजिक सुधारणेच्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांनी मोलाची भूमिका बजावली. पती ज्योतीराव फुले यांना खंबीरपणे साथ देत आणि प्रसंगी समाजाच्या विरोधात जात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे सामाजिक कार्य अखंडितपणे सुरू ठेवले.

महिलांचे शिक्षण, त्यांचे सबलीकरण, त्यांचे हक्क यांच्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटत होत्या. पुण्यातील भिडे वाड्यात १८४८ मध्ये सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा सुरु केली. ज्योतीराव फुलेंच्या मदतीने सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली ही शाळा देशातील महिलांसाठीची पहिलीच शाळा होती. त्यामुळेच २०१४ मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांची आज १८६ वी जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी गुगलकडून डूडल तयार करण्यात आले आहे. आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी अविरतपणे झटणाऱ्या सावित्रीबाई फुले या डुडलमध्ये दिसत आहेत. अनेक स्त्रियांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचे डूडल गुगलकडून तयार करण्यात आले आहे. देशात महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाईंची शाळा गुगलच्या डूडलमध्येही दिसून येते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 8:59 am

Web Title: google doodle pays tribute to savitribai phule
Next Stories
1 काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
2 मालकीच्या वादात ‘सायकल’ रुतली!
3 तुर्कस्तानातील हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली
Just Now!
X