महिलांबाबत भेदभावपूर्ण मेमो लिहिणारे अभियंता जेम्स डेमोर यांना गुगलने नोकरीवरून काढले आहे. या वेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई रजेवर होते. या प्रकारामुळे आपली रजा रद्द करून ते कार्यालयात परतले. गुरुवारी टाऊन हॉलमध्ये ते कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. त्यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून डेमोरने कंपनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेमोर यांनी मागच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना दिलेल्या कंपनीअंतर्गत मेमोमध्ये लिहिले होते की, ‘महिला आणि पुरुषांच्या पात्रतेत फरक असण्यामागे जैविक कारण आहे. तंत्रज्ञान नेतृत्वाच्या बाबतीत महिलांचे प्रतिनिधित्व असमान असण्यामागे हाच फरक कारणीभूत आहे.’ डेमोर यांचा हा मेमो मागच्या आठवड्यात लीक होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे गुगलवर प्रचंड टीका सुरू होती.

सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांवर आधीपासूनच भेदभावाचा आरोप होत असताना गुगलचे हे प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या श्रम विभागाकडून गुगलमध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या वेतनाबाबत चौकशी सुरू आहे. अन्य तंत्रज्ञान कंपन्यांच्या तुलनेत गुगलमध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google engineer suspended for anti diversity memo against woman
First published on: 09-08-2017 at 19:29 IST