26 September 2020

News Flash

लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात गुगलमध्ये ४८ जणांवर कारवाई

लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात १३ वरिष्ठ व्यवस्थापकांसह ४८ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे,

| October 27, 2018 03:05 am

न्यूयॉर्क : सन २०१६ पासून लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात १३ वरिष्ठ व्यवस्थापकांसह ४८ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी दिली. गुगल कंपनीने अयोग्य वर्तनाबाबत कठोर भूमिका घेतली असून त्यात पदाचा मुलाहिजा न ठेवता कारवाई केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून जाताना कुठलेही पॅकेज देण्यात आलेले नाही. दी न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात असे म्हटले होते की, अँड्राइडचे निर्माते अँडी रुबिन यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले असले तरी त्यांना ९ कोटी डॉलर्सचे पॅकेज देण्यात आले होते.

दी न्यूयॉर्क टाइम्सने दिलेले वृत्त चुकीचे असल्याचे पिचाई व गुगलचे उपाध्यक्ष एलिन नॉटन यांनी म्हटले आहे. लैंगिक गैरवर्तनाच्या प्रत्येक प्रकरणाची बारकाईने चौकशी केली असून त्याबाबत नेहमीच कठोर भूमिका ठेवली आहे. एकूण ४८ जणांना अशा वर्तनामुळे काढून टाकण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:05 am

Web Title: google fired 48 employees for sexual harassment
Next Stories
1 साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने केला बलात्कार
2 न्यायालयाचा निकाल सकारात्मक : जेटली
3 ‘सीबीआय’ला वेसण
Just Now!
X