सर्च इंजिन दिग्गज गुगलने गेल्या वर्षी आपलं पेमेंट अॅप Google Tez लॉन्च केलं होतं. या अॅपमध्ये युजर्स आपलं बँक खातं जोडून केंद्र सरकारच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय)द्वारे पेमेंट करु शकतात. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या गुगल फॉर इंडिया या वार्षिक कार्यक्रमात गुगलने Tez चं नाव बदलून Google Pay केलं. आता Google Pay च्या युजर्ससाठी गुगलने आकर्षक ऑफर आणली आहे. जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करणं आणि Google Pay चा वापर वाढावा हा या मागचा हेतू आहे. Google Pay चा वापर करुन ट्रान्झेक्शन(व्यवहार) केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

Google Pay चा वापर करुन किमान 5 ट्रान्झेक्शन करणं गरजेचं –
गुगलच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजरने 18 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत Google Pay चा वापर करुन किमान 5 ट्रान्झेक्शन करणं आवश्यक आहे. ट्रान्झेक्शन करताना गुगल तेज युपीआय आयडीचा वापर करुन पर्सन-टू-पर्सन ट्रान्झेक्शन(P2P), दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्झेक्शन आणि कॅश मोड व बँक खात्याचा वापर करुन व्यापाऱ्याच्या बँक खात्यात पेमेंट करावं लागणार आहे.

एकूण 5 कोटी रुपयांचं बक्षीस –
Google Pay ऑफर अंतर्गत कंपनी एकूण 5 कोटी रुपयांच्या बक्षिसाचं वाटप करणार आहे. या बक्षिसाचं कंपनी 5 रुपयांपासून 1 लाख रुपयांच्या हिश्श्यामध्ये वाटप करण्यात आलं आहे. मात्र, केवळ निवडक युजर्सच बक्षिसाची संपूर्ण राशी जिंकू शकतात असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

इन्स्टंट लोन –
या ऑफरव्यतिरिक्त गुगलने इन्स्टंट लोनची सेवा देखील आणली आहे. लोनसाठी कंपनीने अनेक बँकांसोबत भागीदारी केली असून युजर्स थेट अॅपद्वारे इन्स्टंट लोन मिळणार आहे.