भारतातील वृत्तपत्रांमध्ये येणारी माहिती गूगलकडून वापरण्यात येते त्यामुळे भारतीय वृत्तपत्रांना त्याचा मोबदला द्यावा आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसुलाचाही योग्य प्रमाणात वाटा द्यावा, अशी मागणी दी इंडियन न्यूजपेपर सोसायटीने (आयएनएस) गूगलकडे एका पत्राद्वारे केली आहे.

जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या महसुलातील वाटा ८५ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यात यावा, असे गूगल इंडियाचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांना आयएनएसचे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना माहिती गोळा करण्याचा मोठा मोबदला द्यावा लागतो, ही माहिती मालमत्ता असून त्यामुळे गूगलला भारतात वैधता मिळते, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.