माहिती महाजालातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेली गुगल कंपनी पुढील वर्षात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या सहाय्याने देशातील ५०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणार आहे. गुगल कंपनीच्या मुख्यालयाच्या भेटीवेळी मोदींनी ही घोषणा केली. गुगल कंपनी सुरूवातीला भारताच्या १०० रेल्वे स्थानकांवर ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देईल. त्यानंतर पुढच्या वर्षा अखेरीस आणखी ४०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी दिली. तसेच अँड्रॉईड युजर्ससाठी लवकरच १० भाषेत टायपिंग करता येणारी नवी प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा गुगलने केली.
दरम्यान, गुगल कंपनीच्या भेटीवेळी मोदींना कंपनीकडून सुरू असणाऱया विविध शोधांची माहिती देण्यात आली. गुगल कंपनीच्या परिसरातील अत्याधुनिक उत्पादनांनी मोदींचे लक्ष वेधून घेतले. देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून गुगलने सामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असे अॅप गुगलने तयार करावे, असे मोदी म्हणाले.