News Flash

गूगलचा ऑस्ट्रेलियाला ‘सेवा बंद’चा इशारा

वृत्तसेवेसाठी शुल्क आकारण्याची योजना

(संग्रहित छायाचित्र)

 

ऑस्ट्रेलिया सरकारने वृत्तसेवेसाठी शुल्क आकारण्याच्या योजनेची अंमलबजावणी करावयाचे ठरविल्यास त्या देशातील सर्च इंजिनची सेवा खंडित केली जाईल, असा इशारा शुक्रवारी गूगलने दिला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्वरेने गूगलला फटकारताना स्पष्ट केले की, आम्ही इशाऱ्यांना भीक घालत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करू शकता याची नियमावली आम्हीच तयार करतो, असे मॉरिसन यांनी ब्रिस्बेन येथे वार्ताहरांना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निर्णय घेण्यात आला आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियात तशाच पद्धतीने काम होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी नियमावली अयोग्य असल्याचे गूगल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे व्यवस्थापकीय संचालक मेल सिल्व्हा यांनी सिनेट चौकशी समितीसमोर सांगितल्यानंतर मॉरिसन यांनी वरील बाब स्पष्ट केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:23 am

Web Title: google warns australia of service shutdown abn 97
Next Stories
1 केंब्रिज अ‍ॅनॅलिटीकाविरुद्ध ‘सीबीआय’कडून गुन्हा
2 करोना लस सुरक्षित; पंतप्रधानांची ग्वाही
3 देशभरात १० लाख लाभार्थीना लस
Just Now!
X