काँग्रेसने २४, अकबर रोड येथील मुख्यालय रिकामे करावे, अशी नोटीस नगर विकास मंत्रालयाने या पक्षाला बजावली आहे. आपल्याला सरकारतर्फे अशी नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला काँग्रेसने दुजोरा दिला आहे. आम्ही या नोटीसचे उत्तर दिले असून, मंत्रालयाने आणखी चौकशी केल्यास त्याबद्दल माहिती दिली जाईल असे पक्षाचे वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:03 am
Web Title: government asks congress to vacate 24 akbar road office