22 September 2020

News Flash

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले

मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोकानुनयी घोषणा करण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोकानुनयी घोषणा करण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोकानुनयी घोषणा करण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे महसुली तोटा ही त्यांची डोकेदुखीही ठरत आहे. एका अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात भारत सरकारवरील कर्जांत ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्जाच्या स्थितीवरील आठवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अहवालानुसार मागील साडेचार वर्षांत सरकारवरील कर्ज ४९ टक्क्यांनी वाढून ८२ लाख कोटी रूपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारी नजर टाकल्यास जून २०१४ मध्ये सरकारवर एकूण ५४,९०,७६३ कोटी इतके कर्ज होते. जे सप्टेंबर २०१८ मध्ये वाढून ८२,०३,२५३ कोटी रूपये झाला आहे.

कर्ज वाढीमुळे पब्लिक डेटमध्ये ५१.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जी मागील साडेचार वर्षांत ४८ लाख कोटींवरून ७३ लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात मार्केट लोनही ४७.५ टक्क्यांनी वाढून ५२ लाख कोटी रूपयांहून अधिक झाले आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकार दरवर्षी स्टेट्स रिपोर्टच्या माध्यमातून केंद्रावरील कर्जाची आकडेवारी सादर करते. ही प्रक्रिया २०१०-११ पासून सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 3:04 pm

Web Title: government debt increased 49 percent in pm modi four and half era economy business finance ministry status report
Next Stories
1 भाजपाने माझा आणि माझ्या आईचा सन्मान राखला: वरुण गांधी
2 पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जाळले
3 भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज
Just Now!
X