27 May 2020

News Flash

पीएम- किसान योजनेशी आधार जोडणीला ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ

१ ऑगस्ट २०१९ नंतर या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आधारची जोडणी अनिवार्य करण्यात आली होती.

| October 10, 2019 12:08 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रबी पेरणी हंगामापूर्वी शेतकी साहित्य खरेदी करण्याकरता ६ हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी आधार जोडणीकरिता असलेली मुदत सरकारने ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी याबाबतचा निर्णय घेतला.

पीएम- किसान योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी १४ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची रक्कम ३ समान हप्त्यांमध्ये देत असते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.

१ ऑगस्ट २०१९ नंतर या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आधारची जोडणी अनिवार्य करण्यात आली होती. तथापि, आसाम, मेघालय व जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांना मार्च २०२० पर्यंत त्यातून सूट देण्यात आली होती. आधार जोडणीबाबत अनिवार्यतेच्या अटीला वेळ गागत होता आणि त्यामुळे हा निकष आम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिल केला आहे, असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. यामुळे, अद्याप आधारची जोडणी न करू शकलेल्या मोठय़ा संख्येतील शेतकऱ्यांना या रकमेचा तत्काळ लाभ मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

पीएम- किसान योजनेंतर्गत सुमारे १४ कोटी शेतकऱ्यांना ८७ हजार कोटी रुपये मिळणार असल्याने ही अद्वितीय योजना आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 12:08 am

Web Title: government extended aadhaar seeding date to pm kisan scheme zws 70
Next Stories
1 मॉब लिंचिंगविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्या ५० सेलिब्रेटिंवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द
2 लाजिरवाणं : आर्थिक विषमतेच्या बाबतीत भारत जगात अव्वल स्थानी
3 काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज यात शंका नाही : ज्योतिरादित्य सिंधिया
Just Now!
X