केंद्र सरकारने पूरग्रस्त केरळसाठी आयकर परताव्याच्या (इन्कम टॅक्स रिटर्न) मुदतीत वाढ केली आहे. केरळला भीषण महापूराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुराचं पाणी आता ओसरु लागलं असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे.

अर्थमंत्रालयाने पत्रक जारी करत आयकर परताव्याची मुदत वाढवत असल्याचं सांगितलं आहे. ‘केरळमध्ये आलेला भीषण महापूर लक्षात घेता सीबीडीटीने (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) आयकर परताव्याची मुदत वाढवली असून 31 ऑगस्ट 2018 वरुन 31 सप्टेंबर 2018 केली आहे’, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

याआधी सर्व करदात्यांसाठी आयकर परताव्याची मुदत 31 जुलैवरुन 31 ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली होती. मात्र सध्या जी मुदत वाढवून देण्यात आली आहे ती फक्त केरळमधील करदात्यांसाठीच आहे.