07 March 2021

News Flash

Good news – पीएफवर आता आठ टक्के व्याज

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे. सरकारने ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली आहे. अल्प बचत योजनांवरील व्याजदरात दर तिमाहीत बदल होत असतात.

ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात ७.८,७.३ आणि ८.७ टक्के वाढ करण्यात आली आहे. पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. सध्या हा व्याजदर ७.६ टक्के होता.

किसान विकास पत्रावर ७.७ टक्के व्याज देण्यात येईल. याआधी ७.३ टक्के व्याज मिळायचे. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर ८.५ टक्के व्याज देण्यात येईल. याआधी हा व्याजदर ८.१ टक्के होता. त्यामध्ये ०.४ टक्के वाढ करण्यात आली आहे. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर ०.३ टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2018 12:30 pm

Web Title: government hikes interest rate on ppf other small savings
टॅग : Interest Rate,Pf
Next Stories
1 दहशतवादी बुरहान वाणीच्या नावाने पाकिस्तानमध्ये पोस्टाचे तिकीट
2 Jio Phone 2 खरेदी करण्याची आणखी एक संधी, मिळेल कॅशबॅक ऑफर
3 कर्मचाऱ्याची अक्षम्य चूक भोवली, जेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-तोंडातून रक्त
Just Now!
X