12 August 2020

News Flash

पर्यावरण परवान्यांच्या निकषांबाबत सरकार असंवेदनशील

राष्ट्रीय हरित लवादाचे ताशेरे

 

पर्यावरण परवाने देताना त्या संबंधीच्या निकषांचे पालन करण्यात यावे. पर्यावरण परवाने देण्याच्या प्रक्रियेतील निकषही अपुरे आहेत, असे ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण व वन मंत्रालयावर  ओढले आहेत.

हरित लवादाने म्हटले आहे, की पर्यावरण परवान्यांच्या निकषांची देखरेख सातत्याने केली गेली पाहिजे. लवादाचे अध्यक्ष न्या. ए. के. गोयल यांनी सांगितले, की पर्यावरण निकषांच्या पालनाबाबत योग्य प्रकारे देखरेख केली जात नाही. पर्यावरण परवान्यांचे निकष व पाहणी यांत अनेक त्रुटी आहेत. त्यासाठीची व्यवस्था मजबूत करण्यात यावी. पर्यावरण व वन मंत्रालयाने घटनात्मक निकषांच्या पालनाबाबत असंवेदनशीलता दाखवली आहे. नुसत्या उपाययोजना असल्याचे सांगून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी समाधानकारक पद्धतीने करणे गरजेचे आहे. जर अंमलबजावणी करण्यात आली असती, तर त्यांनी तसे पुरावे देणे आवश्यक होते. पर्यावरण व वन मंत्रालयाने शाश्वत विकास उद्दिष्टांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्याच्या व्यवस्थेत काय त्रुटी आहेत हे आम्ही परत सांगत बसणार नाही. या बाबतचे प्रतिज्ञापत्र पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत ई-मेलने सादर करण्याची गरज आहे, असेही लवादाने बजावले आहे.

आता या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबर रोजी करण्यात येईल. पर्यावरण परवाने देताना कठोर निकष असावेत, यासाठी संदीप मित्तल यांनी याचिका दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:34 am

Web Title: government insensitive to environmental licensing criteria abn 97
Next Stories
1 ट्विटर हल्ल्याचे सूत्रधार अटकेत
2 ‘न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाईची तरतूद घटनाबाह्य़’
3 मुलांचे शिक्षण समाजाने ठरवू नये!
Just Now!
X