लोकसभेत आज गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या दहा खासदारांचे निलंबन केले जाण्याची शक्यता आहे. सरकार यासंदर्भात प्रस्ताव मांडू शकते. त्यामुळे आज सभागृहात गोंधळ घालणाऱ्या त्या खासदरांविरोधात कार्यवाही केली जाऊ शकते. ज्यांनी लोकसभेत कागदपत्र फाडून भिरकावली होती.

आज संसदेचे कामकाज सुरू असताना विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी गोंधळ घातल, दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर काही कागदपत्र फाडून फेकली होती. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही लोकशाहीला लाजीरवाणं करणारी घटना आहे, असं म्हटलय.

टीएन प्रथापन, हिबी एडन, गुरजितसिंग औजला, माणिकम टागोर, दीपक बैज, एएम आरीफ, डीन कुरियाकोस आणि जोतिमानी या खासदारांच्या निलबंनाचा प्रस्ताव सरकारकडून मांडला जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेत गोंधळ.. कागदपत्रांची फेकाफेक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस होता. दरम्यान आज दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्याप्रमाणावर गोंधळ घालत संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले.

प्रचंड गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज १२.३० वाजेपर्यंत स्थगितही करण्यात आले होते. दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी कागदपत्र फाडून फेकाफेक करत, घोषणाबाजी देखील केली. तसेच, खेला होबे असे देखील नारे देण्यात आले.

पेगॅसस, करोना आदी मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तर, काँग्रेससह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची व दबाव निर्माण करण्याची रणनिती आखली आहे.