05 December 2020

News Flash

सोनं खरेदीला ‘अच्छे दिन’?; आयात शुल्क घटण्याची शक्यता

वाणिज्य मंत्रालयाची अर्थ मंत्रालयाला शिफारस

संग्रहित छायाचित्र

सोन्याच्या दरांमुळे चिंतेत असाल आणि सोने खरेदी करायची असेल, तर काही दिवस थांबल्यास तुमच्या पैशांची बचत होऊ शकते. कारण केंद्र सरकारकडून लवकरच आयात शुल्कात घट होण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी याबद्दलची माहिती दिली. सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्यास देशभरातील बाजारांमधील सोन्यांच्या दरांत घट होऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होईल. गेल्या ६ आठवड्यांपासून सोन्याचा दर २८ ते २९ हजारांदरम्यान राहिला आहे. जूनच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांमध्ये किरकोळ घट झाली होती. मात्र यानंतर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली.

१ जुलैपासून सोन्याच्या दागिन्यांवरील विक्रीकरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सोन्याची तस्करी वाढल्याची शक्यता आहे. या तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारकडून आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारतीय वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव मनोज द्विवेदी यांनी ‘चालू खात्यातील तोट्याचे प्रमाण सध्या कमी होत आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय अर्थसंकल्पातच घ्यायला हवा होता,’ अशी माहिती दिली आहे.

‘सोन्यावरील आयात शुल्कात कपात केली जावी, अशी शिफारस वाणिज्य मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाला करण्यात येणार आहे,’ असेदेखील द्विवेदी यांनी म्हटले. मात्र अर्थ मंत्रालयाकडून या निर्णय नेमका केव्हा घेतला जाणार, याबद्दलची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. चालू खात्यातील नुकसान कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०१३ मध्ये सोन्यावरील आयात शुल्क १० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 7:37 pm

Web Title: government likely to reduce import duty on gold
टॅग Gold
Next Stories
1 २००२ मध्ये मुशर्रफ भारतावर करणार होते अण्वस्त्र हल्ला
2 ‘भारत-चीनमधील तणावाची परिणती युद्धात होऊ शकते’
3 ‘नितीशकुमारांनी जनतेचा विश्वासघात केला’
Just Now!
X