28 November 2020

News Flash

‘सरकारी माय’ बाळंतपण करणार !

 गर्भवती महिलांना बाळाच्या जन्माच्या आधीच्या सहा-सात महिन्यांसाठी उपचार, प्रवास व भोजनाचा खर्च केंद्र सरकारकडून मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी श्रीनगर येथे

| June 23, 2013 09:28 am

 गर्भवती महिलांना बाळाच्या जन्माच्या आधीच्या सहा-सात महिन्यांसाठी उपचार, प्रवास व भोजनाचा खर्च केंद्र सरकारकडून मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी श्रीनगर येथे ही योजना जाहीर केली.
गरोदर महिलांसाठी आठ वर्षांपूर्वी केंद्राने ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ सुरू केली आहे. मात्र त्या योजनेनुसार केवळ बाळंतपणातच मातेला आर्थिक सहाय्य दिले जात होते. आता या योजनेचाच विस्तार करण्यात आला असून बाळाच्या जन्माच्या सहा ते सात महिने आधीपासूनच मातेला आर्थिक लाभ मिळणार
आहे.
या योजनेनुसार सरकारी रुग्णालयात बाळंतपणासाठी नाव नोंदविणाऱ्या गर्भवती महिलेला गर्भारपणाच्या काळात पूर्ण मोफत उपचार मिळतील. घर ते रुग्णालय आणि घर अशा प्रवासाचा खर्च मिळेल.  देशातील गरोदर महिलांना पैशाअभावी योग्य उपचार, तपासण्या, चौरस आहार आणि रुग्णालयात जाण्यायेण्यासाठीच्या प्रवासाचा खर्च करणे जड जाते. या खर्चाचा भार कमी व्हावा आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्यही चांगले असावे, यासाठी सरकारने ही योजना आखल्याचे आझाद यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयात बाळंतपणासाठी नाव नोंदविणाऱ्या गर्भवती महिलेला गर्भारपणाच्या काळात पूर्ण मोफत उपचार मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 9:28 am

Web Title: government mother will do delivery
Next Stories
1 पाकिस्तानात विदेशी पर्यटकांवर हल्ला; १० ठार
2 उत्तराखंड: हवामानात सुधारणा; मदतकार्याला पुन्हा सुरूवात
3 काँग्रेस नेत्याकडून नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा
Just Now!
X