01 December 2020

News Flash

लष्कर कँटीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचा आदेश, मद्याचाही समावेश

कँटीनमध्ये मद्य, इलेक्ट्रॉनिक तसंच इतर वस्तू स्वस्त दरात विकल्या जातात

केंद्र सरकारने देशभरातील चार हजार लष्कर कँटीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचा आदेश दिला आहे. रॉयटर्नसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे परदेशी मद्यविक्रेत्या कंपनी नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व लष्कर कँटीनमध्ये मद्य, इलेक्ट्रॉनिक तसंच इतर वस्तू स्वस्त दरात विकल्या जातात. लष्कराचे जवान, अधिकारी तसंच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुविधा उपलब्ध आहे. यामधून जवळपास २०० कोटी डॉलर्सची उलाढाल होते.

१९ ऑक्टोबरला संरक्षण मंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भविष्यात थेट आयात केलेल्या वस्तूंची खरेदी हाती केला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. जुलै महिन्यात यासंबंधी लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी चर्चा करण्यात आली होती याचा उल्लेखही आदेशात आहे. यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मोहिमेला पाठिंबा देण्याचा मुख्य उद्देश आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

आदेशात नेमक्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे हे स्पष्ट करण्यात आलं नाही. मात्र यामध्ये आयात होणाऱ्या मद्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 10:00 am

Web Title: government ordered army shops in the country to stop buying imported goods sgy 87
Next Stories
1 Coronavirus : देशभरात २४ तासांत ५३ हजार ३७० नवे रुग्ण, ६५० जणांचा मृत्यू
2 हाथरसमध्ये अल्पवयीन मुलांकडून चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार!
3 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर
Just Now!
X