09 August 2020

News Flash

कांद्याची सरकारी किंमत २२ रुपये किलो; मात्र, सर्वसामान्यांना मिळतोय ७० रुपये किलो

कांद्याच्या प्रमुख उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तसेच कांदा पिकाला उशीर झाल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच कांदा महागला आहे.

देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर अठरा हजार टन कांदा आयात करण्यात आला असून तो सध्या २२ रुपये प्रति किलोने विकला जात आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही सर्वसामान्य ग्राहकांना ७० रुपये प्रति किलोनेच किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्यावतीने नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कमी किंमतीत कांदा विकला जात आहे. मात्र, तरीही सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या चढ्या भावातून अद्याप दिलासा मिळालेला नाही. दरम्यान पासवान म्हणाले, सरकारने आजपर्यंत १८ हजार टन कांदा आयात केला आहे. मात्र, अनेक प्रयत्न करुनही आत्तापर्यंत कवेळ २००० टन कांद्याचीच विक्री होऊ शकली आहे. कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार हरएक प्रयत्न करीत आहे. आसाम (१०,००० टन), महाराष्ट्र (३४८० टन), हरयाणा (३००० टन) आणि ओडिशा (१०० टन) या राज्यांनी कांद्यांची मागणी केली होती. मात्र, आता या राज्यांनी आयात करण्यात आलेला कांदा खरेदी करण्यास नकार दिल्याचेही पासवान यांनी सांगितले.

नाफेड तयार करणार बफर स्टॉक

सन २०२० साठी कांद्याचा बफर स्टॉक वाढवून १ लाख टन करण्यात येणार असल्याचेही पासवान यांनी सांगितले आहे. सरकारच्यावतीने नाफेड कांद्याचा बफर स्टॉक तयार करते. नाफेड गेल्या मार्चपासून जुलै महिन्यापर्यंत रब्बीच्या मोसमात तयार होणारा कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे.

कांद्याच्या प्रमुख उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तसेच कांदा पिकाला उशीर झाल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. हेच कारण होते की, कांद्याच्या किंमतीत सातत्याने मोठी तेजी पहायला मिळाली. कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 7:15 pm

Web Title: government price of onion is 22 rupees per kg however the common people are getting in 70 rupees per kg aau 85
Next Stories
1 ‘सीएए’, ‘एनआरसी’ आणि ‘एनपीआर’विरोधात सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचाही निषेध मोर्चा
2 “…तर मी योगी आदित्यनाथांच्या छातीवर बसून त्यांची हाडं मोडली असती”
3 युक्रेनचं प्रवासी विमान पाडण्याच्या प्रकरणात इराणमध्ये काही जणांना अटक
Just Now!
X